बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

Shriganesh

खूप दिवसांपासून मनात होते, प्रत्यक्षात यायला बराच वेळ लागला. मुळात मी कुणी लेखिका नाही. माझे आयुष्य साधे सुधे आणि सर्वसामान्य आहे. तरीही या रोजच्या आयुष्यात अश्या बऱ्याच घटना घडतात ज्या मला कुणालातरी सांगाव्याश्या  वाटतात. बरेच अडथळे येतात. बरेच आनंदाचे क्षण असतात. चांगले वाईट अनुभव असतात. अगदी मुलांना   डब्ब्यात काय बरे द्यावे पासून पिरामिड  च्या देशात का अराजकता असे वेगवेगळे प्रश्न पडतात. सर्वसाधारण आयुष्यातील रोजचे प्रश्न सोडवताना आई म्हणून, बाई म्हणून, बायको म्हणून, गृहिणी म्हणून, एक नागरिक म्हणून काय काय अनुभव येतात ते सांगावेसे वाटते. त्याचबरोबर तुमाचाकडे ह्याची उत्तरे असतील तर .....माझे प्रश्न सुटतील आणि मी अजून मोठ्या म्हणजे पिरामिड कुणी बांधले, त्यांचे भविष्य काय ह्यावर लक्ष केंद्रित करेन...खरे तर नाही न वाटले हे सगळे. पण नुसते प्रश्नच नाही बऱ्याचदा आपल्याकडे उत्तरे, अनुभव पण असतो सांगण्यासाठी. म्हणून हि हितगुज आपल्याशी.......ह्या प्रवासात विषयाला बंधन नसेल, तसा कुठला मोठा उद्देश पण नसेल.... मनमोकळ्या  गप्पा करणे नक्कीच असेल. आज पासून श्रीगणेशा  करते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा