मंगळवार, ५ एप्रिल, २०११

Navin Sanvatsar!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 

हितगुज सुरु केले तेव्हा मनात खूप काही होते.....अजूनही आहे....पण तेव्हा वाटले कि मी रोज लिहिले तरी बरेच लिहायचे राहून जाणार. पण अचानक असे काही झाले कि ते विचार एकतर "शिळे" झालेत कारण माझा लिखाणाचा वेग कमी पडत होता नाहीतर ते विचार निघूनच गेलेत. "महिला दिन" होता तेव्हा ३/४ दिवस आधी पासून खूप खूप वेगवेगळे विचार होते मनात....काही खूप positive , काही negative ...काही क्रांतिकारक....पण मग अरुणा शानबाग ची माहिती इतक्या वेगाने काळजात घुसली कि मन सुन्न झाले.....आणि काहीही लिहिलेच नाही. आणि आज अरुणा शानबाग ला ना वर्तमान पत्रात जागा ना TV वर.......सुरवातीला मी पण खूप कळवळून विचार केला आणि आज जाणवते आहे कि माझ्या विचारांची तीव्रता कमी झालेली आहे. असे का होते? ह्या आधी पण अरुणा शानबाग तेवढ्याच दुखात होती आणि ह्या नंतर पण असणार. मग फरक कुठे पडला? मग जपान ची  सुनामी आली....परत काळजात घुसली......बस तेवढेच..... असे का होते?  दुखाची, विचारांची तीव्रता वर्तमान पत्रे, tv आणि net तर control करत नाहीत ना? सतत नाविन्याचा घ्यास इतका लागलाय का  कि दुखे पण नवीन हवीत, काळज्या पण नवीन हव्यात? 

तुम्हाला   काय वाटते? तुम्ही तुमचे विचार कसे manage करता?  तुमच्या विचारांवर कुणाचा आणि कश्याचा प्रभाव आहे? 

माझे काही विचार निघूनच गेलेत....ते कसे ते सांगेन....तो पर्यंत तुम्ही सांगा तुम्ही कसे manage करता आपले चांगले, वाईट, ताजे -शिळे, positive -negative विचार? 

नवीन वर्षाचे परत स्वागत.

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

Mobile puran....

पंधरा दिवस झाले माझ्या mobile चा charger तुटला आहे. एका मैत्रिणीचा landline वर call आला आणि म्हणाली अगं' १५ रुपयांना मिळतो का नाही आणत लवकर, कशी जगतेस mobile शिवाय. तिला १००० किलोमीटर वर बसून काय  माहिती न मला १५ रुपयांचा charger आणणे किती कठीण आहे. सध्या तरी mobile बंद आहे हि परिस्थिती आहे, charger आणणे कठीण का नंतर कधीतरी.............

खरच इतके कठीण आहे का mobile शिवाय जगणे? होय. आहे. पण अशक्य नक्कीच नाही. सध्या वर्तमानपत्रात आणि नेट वर उलट सुलट चर्चा कि mobile चा मेंदूवर परिणाम होतो का? घाबरायचे कारण नाही कारण अजून निष्कर्ष निघालेला नाहीये. आणि वाईट परिणाम होतो असा निष्कर्ष जरी निघाला तरी काय लोक mobile वापरायचे सोडणार आहेत का? नाही, अजिबात  नाही. 

mobile शिवाय आजचे आयुष्य कसे असते?  लोक माझ्याकडे सहानभूतीने पाहतात. अगदी माझ्या कामवाल्या बाईपासून छोटे मोठे काम करणाऱ्या  plumber पर्यंत सगळे  मला दिलासा देतात. charger आला न कि सुरु होणार ग' बाई तुझा mobile . तोवर जगणे कठीण आहे, पण धीर धर. काही लोक तुच्छतेने पाहतात कशी काय मी " stone age " मध्ये जगू शकते. काही लोक कीव करतात ....बिचारी, कामवाली कडे पण चालणारा mobile आहे आणि हिच्याकडे नाही. काही लोक आश्चर्य करतात, तू जगतेस च कशी??? सारांश आपल्याला mobile नाही म्हणजे आयुष्य  काय हे च माहिती नसल्याचा समज सगळ्या लोकांचा झाला आहे. आणि १५ दिवसांपूर्वी मी पण त्याच लोकात होते. 2G , 3G काय काय G , C ,  D स्कॅम्स सध्या प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक media ची जागा व्यापतात आणि लोकांना हे काय होते आहे कसे होते आहे ह्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही कारण ते त्यांच्या mobile मध्ये busy आहेत. गाणी ऐकण्यापासून, sms करण्यापर्यंत. लोकांचे कमालीचे mobile प्रेम आणि अवलंबित्व तर ह्याला जबाबदार नाही न......सध्या तरी तो विषय  नाहीये आपला. पण mobile हा सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे हे मात्र सत्य आहे. 

मग mobile शिवाय माझे आयुष्य कसे सुरु आहे? ऐकणार? एकदम छान. काही साक्षात्कार झाले. काही नवीन गोष्टी शिकले. सुरवातीचे ३/४ दिवस तर मला पण वेड लागायची पाळी आली होती. कसे काय बरे करायचे आता. मग बाबांनी landline वर फोन केला, काय ग' ३/४ दिवसांपासून काही फोन नाही. त्यांना सांगितले माझे दुखंडे......charger वैगेरे....ते हसले....चला तू सुटलीस कटकटीतून. मला काहीही कळले नाही. पण मग माझी झोप मोड होणे बंद झाले. कारण माझा landline no काही सगळ्यांकडे नाहीये.  खरच कुणाकुणाला आपल्याबद्दल आस्था आहे ते कळले, कारण ज्यांच्याकडे माझा no नाहीये त्यांनी कुठून कुठून मिळवून मला landline वर फोन केलेत.....घरातून बाहेर पडायच्या आधी मी जरा विचार करून निघू लागले कि आता मला ७ मिनिटात बस stop वर असायला हवे, आता मला ४५ मिनिटात र च्या शाळेत असायला हवे. sms करायचा  आणि वाचायचा वेळ वाचायला लागला. आणि तो वेळ वर्तमानपत्र वाचनात कारणी लागू लागला (नाहीतर माझी तक्रार  होती कि न आल्यापासून मला वर्तमानपत्र पण वाचायला वेळ नाहीये) आणि cost cutting पण आपोआप च सुरु झाले, फोन बंद तर calls बंद. आणि एक काम वाचले, फोन charge करायला ठेवायचे आणि काढायचे.....जरा extra planning करावे लागते. मी आता निघणार मग मी पोहोचेपर्यंत संपर्क नाही....काही निरोप, आठवण देणे असेल आता च सांगा.....परत लोकांना असे नाही सांगता येत कि हो मी निघालेच, पोहचतेच आहे, traffic jam आहे....घरातून वेळेवर निघून, कुठेही वेळेवरच पोहोचावे लागते आणि विश्वास ठेवा ह्यामुळे वेळ वाचायला लागला. 

मग बऱ्याच गोष्टी दिसायला लागल्यात.....र च्या शाळेत Annual Day ला एकही पालकाचे न थांबणारे calls .  धड call मध्ये लक्ष नाही, धड कार्यक्रमात.हॉस्पिटल मध्ये हि patient ला भेटायला येवून call वरच मोठ्या मोठ्या ने बोलणारे लोक. मोठी माणसे बोलत आताना games खेळण्यात मश्गुल असलेले teenagers . रस्त्यावरून स्वतःच्या मोबिले वरून दुसऱ्यांना जबरदस्तीने "मुन्नी बदनाम हुई....." मोठ्याने ऐकवणारे  संगीत प्रेमी (???)  ......नुसताच मिस call देवून काहीतरी सांगायचा प्रयत्न करणाऱ्या कामवाल्या (ह्या कामवाल्या फार येत आहेत न मध्ये मध्ये....पण त्यांच्या शिवाय   आयुष्य कसे जगायचे हे अजून शिकले नाही न मी) .... गाडी चालवताना येणारे, किवा केले जाणारे calls . mobile मूळे, हो निघालेच, अडकले आहे जरा, अशी देता येणारी खोटी उत्तरे.......किरण बेदिनी...हो The Famous किरण बेदी....एक कुठलेसे पुस्तक लिहिले आहे mobile वापरताना पाळायच्या manners वर. त्याबद्दल लोकसत्ते मध्ये वाचले होते खूप पूर्वी  तेव्हा मी च म्हटले हे काय,  हा काय विषय झाला का पुस्तकाचा. पण आज स्वतः कडे mobile नसताना बऱ्याच गोष्टी पाहू शकले आणि पटले कि हो क्रांती झाली आहे पण लोक शिक्षण खरोखरीच झालेले नाहीये...


म्हणजे मी mobile शिवाय जगायला शिकले आहे तर मी आता कधीच mobile वापणार नाही का? नाहीनाही तसे नाही बर का....पण आता ती अस्वस्थता, आधीरपणा, अपंगत्व जाणवत नाही. अजूनही mobile च्या उपयोगिते बद्दल मनात शंका नाहीत. आपले आयुष्य सोपे करायला मी नक्कीच लवकरच वापरेन mobile . पण माझ्यासाठी mobile आहे, मी mobile साठी च जगत नाही हे विसरले होते, ते ह्या निम्मिताने कळले. नाहीतर आजच्या mobile मध्ये काय नाही, कॅमेरा पासून facebook पर्यंत सगळे. आणि univarsal remote , plam computer आणि अजून काय काय असलेले mobile लवकरच घरकाम करणाऱ्या  कामवाल्या बायका पण घेवून  फिरतील इतक्या जोमाने हि सगळी क्रांती सुरु आहे. काय सांगता येते अजून १५/२० वर्षांती लोक in -built मोबिले वापरातील, device आपल्यातच, शरीरातच लावून घायचे. ....एकूण काय ह्या प्रगतीला (!!!????) अंत नाही. कुठे आणि कसे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. नाहीतर एकाच घरातील लोक एकाच घरात राहून एकमेकांना mobile वरून sms करून किवा call करून गप्पा मारतील काही ठिकाणी तर असे सुरु पण असेल....आणि MMS वैगेरे सारखे दुरुपयोग पण सुरूच आहेत  . ...शेवटी कुठलीही शक्ती हि अशीच असते. व्यवस्थित वापरली तर ठीक नाहीतर ती च आपल्यावर उलटते......

मी घरात साधा landline फोन नसतानाचे पण आयुष्य पहिले आहे....माझ्या पिढीच्या सगळ्यांनीच. आणि आज र ला असे सांगितले कि ती आश्चर्याने मग तुम्ही कसे करायचा? असे विचारते.......चुलीवर कसा काय बर स्वयंपाक करत असतील माझ्या आज्ज्या, पणाज्या    , खापर पणाज्या अगदी तसेच करायचो हे उत्तर मला आत्ता कळले......

लवकरच charger ठीक करेन....आणि आज्ज्या, पणाज्या आणि खापर पणाज्यान च्या age मधून बाहेर येते ... तोवर बघते mobile शिवाय जगण्याचे अजून काही फायदे सापडले तर .......


बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

Shriganesh

खूप दिवसांपासून मनात होते, प्रत्यक्षात यायला बराच वेळ लागला. मुळात मी कुणी लेखिका नाही. माझे आयुष्य साधे सुधे आणि सर्वसामान्य आहे. तरीही या रोजच्या आयुष्यात अश्या बऱ्याच घटना घडतात ज्या मला कुणालातरी सांगाव्याश्या  वाटतात. बरेच अडथळे येतात. बरेच आनंदाचे क्षण असतात. चांगले वाईट अनुभव असतात. अगदी मुलांना   डब्ब्यात काय बरे द्यावे पासून पिरामिड  च्या देशात का अराजकता असे वेगवेगळे प्रश्न पडतात. सर्वसाधारण आयुष्यातील रोजचे प्रश्न सोडवताना आई म्हणून, बाई म्हणून, बायको म्हणून, गृहिणी म्हणून, एक नागरिक म्हणून काय काय अनुभव येतात ते सांगावेसे वाटते. त्याचबरोबर तुमाचाकडे ह्याची उत्तरे असतील तर .....माझे प्रश्न सुटतील आणि मी अजून मोठ्या म्हणजे पिरामिड कुणी बांधले, त्यांचे भविष्य काय ह्यावर लक्ष केंद्रित करेन...खरे तर नाही न वाटले हे सगळे. पण नुसते प्रश्नच नाही बऱ्याचदा आपल्याकडे उत्तरे, अनुभव पण असतो सांगण्यासाठी. म्हणून हि हितगुज आपल्याशी.......ह्या प्रवासात विषयाला बंधन नसेल, तसा कुठला मोठा उद्देश पण नसेल.... मनमोकळ्या  गप्पा करणे नक्कीच असेल. आज पासून श्रीगणेशा  करते.